
सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सेवा - निवृत्त सैनिक संघ सावंतवाडीस भेट देत नागरिकांशी संवाद साधला. या परिसरातील लोकांचे जीवन अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी माझे प्रयत्न कधीच थांबलेले नाहीत. या भागातील नागरिकांच्या हितासाठी सध्या सुद्धा विविध उपक्रम राबवले जात आहेत असे मत केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
ते म्हणाले,माझ्या नेतृत्वाखाली या संघाने जो विकास साधला आहे, तो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. माझ्या कार्याचा उद्देश नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी आहे आणि मी त्यांच्या गरजा ओळखूनच पुढे कार्यरत राहतो. आता, येत्या काळात या कार्याला आणखी वेग देण्यासाठी, नागरिकांच्या प्रगतीसाठी आणि त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी मी कायम कार्यरत राहणार आहे. आपल्या सहकार्यामुळे, या परिसरात अधिक विकास साधला जाईल, आणि आपण सर्व मिळून एक सुंदर भवितव्य निर्माण करू असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले. यावेळी जिल्हा संघटक संजू परब, अमित कामत, गुरूनाथ सावंत, हेमंत बांदेकर, सत्यवान बांदेकर, नंदू शिरोडकर, श्री. आईर, श्री. सावंत, श्री.गावडे यांसह सिंधुदुर्ग जिल्हा सेवा - निवृत्त सैनिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.