
सावंतवाडी : आकाश देवकर यांचे सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील विश्वासू सहकारी समाजसेवक संतोष तळवणेकर यांना श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले संस्थापित राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या सिंधूदुर्ग जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल आहे. नियुक्ती पत्र संघटनेचे दिग्गज नेते महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायणजी कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत मामासाहेब धडके ,महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश भाई कोळी, महाराष्ट्र सचिव मंगेशजी लाड व महाराष्ट्र कायदेशीर सल्लागार गोरखक बोबडे यांच्या हस्ते देण्यात आले. ही नियुक्ती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष.परिक्षीत खुने यांच्या नेतृत्वाखाली झाली.