
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक 2023-26 साठी आज जिल्हा न्यायालय येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया पार पडली. मतमोजणी उशीरा पर्यंत सुरु होती. काटेकी टक्कर या निवडणुकीत पहायला मिळाली. जिल्हाभरातून प्रत्येक तालुक्यातून वकिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, अशा पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात अध्यक्षपदासाठी अँड. परिमल नाईक विरूद्ध अँड. उमेश सावंत यांच्यात काटेकी टक्कर पहायला मिळाली. अध्यक्षपद व सहसचिव पदासाठी चार तर अन्य पदांसाठी प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणात होते. यात अँड. परिमल नाईक यांनी एका मताने बाजी मारत यश संपादन केले आहे. तर खजिनदारपदी अँड. गोविंद बांदेकर विजयी झालेत. महिला उपाध्यक्षपदी अँड. निलिमा सावंत-गावडे २१ मतांनी विजयी झाल्यात. तर सेक्रेटरीपदी अँड. यतिश खानोलकर, उपाध्यक्ष पुरूष अँड. विवेक मांडकुलकर, सह सचिव अँड. अक्षय चिंदरकर विजयी झालेत. पराभुत उमेदवारांनी चांगली टक्कर दिल्यानं जिल्हा बार असोसिएशनची ही निवडणूक चुरशीची ठरली. नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. परिमल नाईक यांनी सावंतवाडीतील बार मेंबरना या विजयाचे श्रेय देत सर्व मतदारांचे आभार मानले. तर अँड. निलिमा सावंत-गावडे यांनी देखील ऋण व्यक्त केले.