
देवगड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत दिव्यांग व मार्गदर्शक सेलचे " सिंधुदुर्ग दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष" पदी प्रवीण मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या संदर्भात त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. देवगड तालुक्यातील गढीताम्हाणे बौद्धवाडी येथील प्रवीण गणपत मोरे यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत दिव्यांग व मार्गदर्शक सेलचे " सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष" म्हणून झालेल्या त्यांची नियुक्ती बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.