सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद रावराणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 11, 2023 14:07 PM
views 176  views

वैभववाडी : सिंधुदुर्ग भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रमोद रावराणे यांची पुन्हा निवड झाली. अगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षाने श्री रावराणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

 सिंधुदुर्ग भाजपाने जंबो कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये वैभववाडीचे भाजपचे जूने कार्यकर्ते प्रमोद रावराणे यांच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापुर्वी ते जिल्हा चिटणीस म्हणून कार्यरत होते. तत्पुर्वी वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, एडगाव सरपंच अशी विविध पदे त्यांनी सांभाळली आहेत. तालुक्यासह जिल्ह्यातील पक्ष संघटनेत त्यांचं मोठं वजन आहे. भाजपा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांचे समर्थक म्हणून ते परिचित आहे. भाजपच्या पडत्या काळात पक्षाचा खंबीर चेहरा म्हणून ते उभे राहिले होते. प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची असते. पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करणे ही त्यांची खासियत आहे. यामुळेच पक्षाने त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. या निवडीनंतर त्यांचं तालुक्यासह जिल्ह्यात अभिनंदन होतं आहे.