
वैभववाडी : भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झालेल्या नवलराज काळे यांचा वैभववाडी भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री.काळे हे वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावचे सुपुत्र असून ते ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. तसेच ते यापुर्वीही भाजप भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते. मागील कालावधीत त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन पक्षाने पुन्हा त्यांना जिल्हाअध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. नुकत्याच झालेल्या भाजपा पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी श्री.काळे यांची जिल्हाअध्यक्ष पदी फेर निवड केली आहे. याबद्दल वैभववाडी तालुका भाजप कार्यालय येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा तालुका वैभववाडी अध्यक्ष नासीर काझी, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे, बाळा हरयाण, अंबाजी हूंबे, राजेंद्र राणे, प्राची तावडे, शारदा कांबळे,नेहा माईणकर, संजय सावंत, बंड्या मांजरेकर, महेश संसारे, हुसेन लांजेकर, हर्षदा हरियाण, रितेश सुतार, दाजी पाटणकर, आनंद फोंडके, बाळकृष्ण वाडेकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.