
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई यांचे विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय मराठी कवी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
कट्टा ता.मालवण येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय (मामा माडये हॉल) येथे रविवार ६ जुलै रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत सदर संमेलन आयोजित करण्यात आले आहे.सदर संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक, कवी व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य श्री.विठ्ठल कदम यांचे हस्ते होणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री श्रीम.संध्या तांबे असणार आहेत.संमेलनाचे प्रमुख अतिथी लेखक,कवी,रंगकर्मी व रंगभूमी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य श्री.विजय चव्हाण हे असणार आहेत.संमेलनास निमंत्रित कवी म्हणून श्री.मधुकर मातोंडकर,श्रीम.सरिता पवार/ चव्हाण,श्री.मनोहर सरमळकर, श्री.अमर पवार,श्रीम.प्रगती पाताडे,श्री.दिलीप चव्हाण,श्री.सतीश चव्हाण उपस्थित राहणार आहेत.संमेलनाचे संयोजक जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हासरचिटणीस चंद्रसेन पाताडे असून संयोजन समितीत जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव, साहित्य व सांस्कृतिक समिती प्रमुख सुरेश पवार,कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण, पी.बी.चव्हाण, उदय शिरोडकर, सुहास मोचेमाडकर यांचा समावेश आहे. हे कवी संमेलनात इतर कवींना सहभागी होण्याची संधी आयोजकांनी ठेवली आहे. यासाठी संयोजकांशी संपर्क (८८०६६१६७७५) करावे असे आवाहन केले आहे.