
सिंधुदुर्गनगरी : कृषी दिनाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वर्दे शाळेतील विद्यार्थ्यांनी शेताच्या बांधावर उतरत भात लावणीचे धडे घेतले विद्यार्थ्यांनी नर्सरी मध्ये जाऊन विविध रोपे लागवडीची माहितीही घेतली यावेळी विद्यार्थ्यांना सुपारीच्या झाडाची रोपे वाटप करण्यात आली. पावसाळा आला कि सगळीकडे भाताच्या लावणीची लगबग सुरु होते. मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या झाडांची माहिती घेण्याकरिता मोंडकर फार्म वर्दे येथे वर्दे जिल्हा परिषद शाळा नं 1 च्या तिसरी ते सातविच्या मुलांनि भेट घेतली. त्यांच्याबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका मंजिरी गांग-नाईक,उपमुखध्यापिका तेजस्वी चव्हाण, नम्रता दयाळ मेस्त्री आणि सुनील रामचंद्र सूर्यवंशी यांनीही भेट दिली.
सर्वप्रथम शिक्षिका प्रांजल परब यांनी भात लागवडीची चार सूत्र पद्धत ची माहिती त्याचप्रमाणे शेती सेंद्रिय म्हणजे शेणखत, गांडूळखत गिरीपुष्प वापरून कश्या प्रकारे करायची याबद्दल मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच फार्म वर असलेल्या विविध झाडांची माहिती देण्यात आली. त्यानंतर झाडातील अंतर राखून कश्या प्रकारे लावणी केली जाते व त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्याप्रमाणे मुलांबरोबर शिक्षिका चव्हाण, मेस्त्री व शिक्षक सूर्यवंशी यांनी लावणी केली .
प्रदीप गर्डी यांनी नर्सरी मधील मोहोगणी, शिसम, कांचन, काजू, आंबा या झाडांची रोपे दाखवून त्यांच्या लागवडीबद्दल माहिती दिली.कृषी दिनाचे औचित्य साधून मुलांना एक एक सुपारीचे रोपटे देण्यात आले. व त्यांची कश्या प्रकारे लागवड व जोपासना करावी याची माहिती देण्यात आली. सूर्यवंशी सर आणि चव्हाण बाईंनी सरते शेवटी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.