
सिंधुदुर्ग : जेव्हा आपण क्षणोक्षणी या निराकार प्रभुच्या प्रति पूर्ण समर्पित होऊन आपले जीवन जगतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपले जीवन मानवतेच्या कल्याणार्थ समर्पित होऊन जाते. असेच प्रेमा-भक्तिने परिपूर्ण जीवन बाबा हरदेवसिंहजी यांनी स्वतः जगून आम्हाला दाखवले असे अशिर्वचन सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ‘समर्पण दिवस’च्या पावन प्रसंगी व्यक्त केले.
युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ ‘समर्पण दिवस’ समागमाचे आयोजन 13 मे रोजी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या सान्निध्यात संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे करण्यात आले. या शिवाय हा दिवस विश्वभर देखील आयोजित करण्यात आला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, कणकवली, मालवण, वैभववाडी, पडेल कॅन्टीन या ठिकाणाचा समावेश होता. ज्यामध्ये सुफी गायन हा विशेष उपक्रम ठरला. समस्त भक्तांनी बाबजींच्या दिव्य शिकवणुकीचे स्मरण करत त्यांच्या अनुपम जीवनाला नमन केले.
मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणुकीची चर्चा करताना सदगुरु माताजी म्हणाल्या, की बाबाजींनी स्वतः प्रेमाचे मूर्तीमंत रूप बनून निस्वार्थ भावनेने जीवन जगण्याची कला शिकवली. जेव्हा आपण परमात्मयावर खरे प्रेम करु लागतो तेव्हा मायावी संसारातील लाभहानीचा प्रभाव आमच्यावर पडत नाही. त्या परिस्थितीत प्रभू प्रेम आणि प्रभू इच्छाही सर्वोपरि बनून जाते. याउलट जेव्हा आपण स्वतःला ईश्वराशी न जोडता भौतिक वस्तुंशी जोडून राहतो तेव्हा क्षणभंगुर सुख-सुविधांच्या प्रतिच आपले ध्यान केंद्रित असते. त्यामुळे आपण त्याच्या मोहात फसून प्रायः वास्तविक आनंदापासून वंचित राहतो. वास्तविकता तर हीच आहे, की खरा आनंद केवळ या प्रभुशी नाते जोडून निरंतर याची स्तुति करण्यात साठला आहे. संतांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन तो प्राप्त केला जाऊ शकतो. भक्ताच्या जीवनातील हेच मूलभूत सार आहे. परिवार, समाज व अवघ्या विश्वामधे स्वतः प्रेममय बनून प्रेमरूपी पुल बांधावेत कारण समर्पण व प्रेम हे दोन अनमोल शब्दच संपूर्ण प्रेमाभक्तिचा आधार असून त्यामध्ये सकलांच्या भल्याची सुंदर भावना निहित आहे.