SPK च्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा

Edited by:
Published on: January 27, 2025 19:52 PM
views 596  views

सावंतवाडी : कोलगाव येथे रस्त्यात सापडलेला मोबाईल सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संबधित मालकाला परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सावंतवाडी पोलिस निरिक्षक अमोल चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केल. वेलिन्सिओ डिसोझा,राज राऊळ आणि अवधुत सावंत अशी या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नाव आहेत. 

शनिवारी रात्री कोलगाव येथे आर्या नोव्हा थिएटर मध्ये सिनेमा पाहण्यासाठी गेले असता तेथून परतत असताना त्यांना वाटेत हा मोबाईल पडलेला मिळाला. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार अमोल टेंबकर यांना दिली. यावेळी त्यांनी पोलिस निरिक्षक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून मालकाचा शोध घेतला. यावेळी तो मोबाईल सबनिसवाडा येथील संतोष तोरसेकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, ते बाहेर असल्यामुळे त्यांचे मित्र गोविंद बांदेकर यांनी तो मोबाईल आपल्या ताब्यात घेतला. यावेळी पोलिस हवालदार दर्शन सावंत, प्रसाद कदम, अमित राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी प्रामाणिकपणा दाखविणार्‍या त्या विद्यार्थ्याचे पोलिस निरिक्षक चव्हाण यांनी कौतुक केले.