
मालवण : कोलकत्ता येथे एका मेडिकल कॉलेज मधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून करण्यात आला. या अमानुष घटनेचा देशभर निषेध नोंदवताना कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग ओपिडी बंद ठेवून डॉक्टर देशव्यापी बंद मध्ये सहभागी झाले आहे. मेडिकल व अनेक विभाग या बंद मध्ये सहभागी आहेत.
मालवण येथे डॉ. लिना लिमये, डॉ. शुभांगी जोशी, डॉ. मालविका झांटये यांनी सूचित केल्या नुसार मालवण मेडिकल असोसिएशन यांच्या पुढाकारातून मालवण शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.
यात डॉक्टर, नर्स, केमिस्ट यांसह लायन्स क्लब, रोटरी क्लब, सिंधुदुर्ग कॉलेज, डीएड कॉलेज, बार असोसिएशन, सौ. शिल्पा यतीन खोत मंडळ सदस्य, नंदिनी कलेक्शन, महिला भगिनी , मातृत्व आधार संघटना सदस्य यांसह अन्य सामाजिक संस्था नागरिकही मोठया संख्येने सहभागी झाले. खांद्यावर काळी पट्टी, हातात संदेश फलक घेऊन हा मूक मोर्चा निघाला. यावेळी महिला अत्याचाऱ्यां विरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या.