
सावंतवाडी : बांदा येथे सिहंगर्जना मंडळाच्यावतीने कार्यक्रमच्यावेळी ब्रह्मांडनायक दशावतारी नाटकाचे उदघाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. यावेळी माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत, उपसरपंच जावेद खतीब, माजी सरपंच दिपक सावंत, गुरु धारगळकर, भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर, मधुकर देसाई, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, गुरु सावंत, मकरंद तोरसकर, ज्ञानेश्वर सावंत, विघ्नेश सावंत, मंडळाचे अध्यक्ष श्री आरोसकर, सचिन साटेलकर, दशावतार कंपनीचे मालक सचिन पालव, साई कल्याणकर, समीर पालव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले की, सिहंगर्जना मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. या मंडळाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी बांदेश्वरचरणी प्रार्थना केली व प्रमोद कामत यांच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोदभाई कामत , जावेद खतीब, बाळू सावंत, दिलीप भालेकर यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी यामंडळाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










