
दोडामार्ग : कसई दोडामार्ग येथील शेतकरी गणपत फोंडू गवस यांच्या बागेत दिवसा ढवळ्या दोन पट्टेरी वाघ त्यांना निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी हातातील जाळीचा मोठयाने आवाज करताच वाघांनी जंगलात पळ काढला. गणपत गवस हे शुक्रवारी सकाळी आपल्या शेत बागात जात होते. त्यावेळी समोर दोन पट्टेरी वाघ शेतात असल्याचे त्यांना निदर्शनास आले.
त्यावेळी त्यांनी सावढं गिरी बालगत हातात असलेल्या जाळीवर मोठ्याने काटी मारून आवाज केला. त्यावेळी त्या दोन्ही वाघानी जंगलाच्या दिशेने पळ काढला. काही दिवसांपूर्वी कुंभवडे येथे ब्लॅक प्याथर निदर्शनास ला होता. त्यामुळे आता येते जंगली प्राण्यां बरोबर आता वाघ लोकवस्तीत येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.