रस्त्याची 'चाळण' की चाळणीचा 'रस्ता' ?

▪️ बांधकाम मंत्र्यांचा नित्याचा मार्ग खडड्यात ! ▪️ ठेकेदारांची हिंमत होतेच कशी ? ; प्रवाशांचा सवाल
Edited by: विनायक गांवस
Published on: September 22, 2024 10:27 AM
views 447  views

सावंतवाडी : मुंबई-बेळगाव रस्त्याची कोलगाव येथे अक्षरशः चाळण झाली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणारा हा रस्ता आहे. ज्या रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री नित्याने प्रवास करातात तिथेच निकृष्ट दर्जाचे काम करण्याची हिंमत ठेकेदाराकडून झाली आहे. 

मुंबई-बेळगाव रस्त्याची कोलगाव येथे अक्षरशः चाळण झाली आहे. बोर्डीचा पूल ते कोलगाव तिठा असा हा रस्ता प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याची चाळण आहे की चाळणीचा रस्ता ? असाच प्रश्न येथून प्रवास करणाऱ्यांना पडत आहे. अशीच परिस्थिती या ठिकाणी कायम असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ठेकेदार, अधिकारी जनतेचा पैसा डांबरात घालत असल्याची संतप्त भावना प्रवाशांची आहे. 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणारा हा रस्ता आहे. ज्या रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री नित्याने प्रवास करातात तिथेच निकृष्ट दर्जाचे काम करण्याची हिंमत ठेकेदाराकडून झाली आहे.  राज्याच्या राजकारणातील रविंद्र चव्हाण हे सडेतोड विकासाला प्राधान्य देणार नेतृत्व आहे. असं असताना ज्या रस्त्यावरून ते स्वतः प्रवास करतात तिथेच ठेकेदार, अधिकाऱ्यांची रस्त्यात मलिदा खावून निकृष्ट दर्जाचं काम करण्याची हिंमत होतेच कशी? असा सवाल संतप्त प्रवाशांकडून होत आहे. या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ? सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारी घेणार का असही विचारल जात आहे. तर निकृष्ट दर्जाचं काम करून जनतेचा पैसा खड्ड्यात घालणाऱ्यांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कडक कारवाई करावी व रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत आणावा अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.