राज्य मार्गालगत भर पावसात साईडपट्टीचे काम

Edited by: लवू परब
Published on: August 13, 2025 11:23 AM
views 136  views

दोडामार्ग : दोडामार्ग - बांदा मार्गालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीने पाण्याचे पाईप खोडाई करून टाकले होते. त्यामुळे रस्त्याची साईड पट्टी पूर्णपणे कमकुवत झाली होती. रस्त्याच्या साईड पट्टी खडी करण करनू मजबूत करावी यासाठी त्या संबंधित कंपनीने पैसे सार्वजनिक बांधकाम विभागकडे वर्ग केले होते. मात्र हे काम उन्हाळ्यात करणे गरजेचे होतेमात्र बांधकाम विभागा व ठेकेदाराने ते कामा केले नाही. मात्र, आता भर पावसात हे काम ठेकेदार करत असल्याने सर्व वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

या संदर्भात कळणे गावचे सरपंच अजित देसाई यांनी म्हटले की भर पावसात दोडामार्ग बांदा मार्गा लगतच्या साईड पट्टीचे काम करणे हे कितपत योग्य आहे. हा सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांचा मनमानी कारभार सुरु आहे. याचा फटका आम्हा वाहनचालक व ग्रामस्थांना बसत आहे.  

त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने खोदलेली साईड पट्टी तात्काळ खडी खालून बुजवावी अशी मागणी सरपंच अजित देसाई यांनी केली आहे.