
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड पट्टीचे काम नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या सूचनेनुसार तात्काळ करण्यात आले. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरातील अभिमन्यू हॉटेल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मुख्य रस्त्याच्या साईड पट्टीचे काम होणे गरजेचे होते या साईड पट्टीमुळे वाहनधारकांचे अपघात तसेच वाहतूक अडथळा होत होता. सातत्याने नागरिकांची मागणी साईड पट्टी दुरुस्तीसाठी येत होती. गेले तीन वर्ष याकडे लक्ष देण्यात आला नव्हता. मात्र यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व त्यांच्या नगरसेवकांनी प्रामुख्याने या साईड पट्टीकडे लक्ष देण्याचे ठरविले आणि कशा प्रकारचा ठराव घेऊन या मुख्य रस्त्यावरील साईड पट्टीचे काम हाती घेतले. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
रंबलरसाठी स्थायी समितीमध्ये नगराध्यक्षांनी दिली मंजुरी
कुडाळ हायस्कूल व पडतेवाडी प्राथमिक शाळेच्या ठिकाणी कोणतेही अपघात होऊ नये. त्यासाठी रंबलर बसवावे अशी मागणी पालक व शिक्षकांकडून होत होती मात्र ही खर्चिक बाब असल्यामुळे आणि बांधकाम समितीमध्ये या खर्चाला मंजुरी मिळत नसल्यामुळे अखेर नगराध्यक्षांनी स्थायी समितीमध्ये या खर्चाला मंजुरी दिली आणि या शाळेच्या रस्त्याला रंबलर बसवण्यात आले.