
देवगड : देवगड येथील साळशी- सरमळेवाडी येथे घेण्यात आलेल्या चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेत कुमार गटात सिध्दवेद कुळकर्णी प्रथम तर बालगटात प्रिन्स बोडवे प्रथम तसेच महिलांसाठी घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत सौ. साक्षी रावले यांनी प्रथम क्रमांकाने विजयी मिळवला आहे.. सुखशांती मंडळ साळशी- सरमळेवाडी व ग्रामस्थांच्या वतीने श्री सत्यनारायण महापुजे निमित्त मुक्तांगण या कार्यक्रमांतर्गत लहान मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी चित्रकला स्पर्धेत बालगटात प्रिन्स बोडवे प्रथम क्रमांक, तस्मी लाडगावकर व उर्वी रावले या दोघांनाही विभागून द्वितीय क्रमांक, समर्थ रासम तृतीय क्रमांक मिळाला.तसेच सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रिन्स बोडवे प्रथम क्रमांक, मुक्ती लाडगावकर द्वितीय क्रमांक, तस्मी लाडगावकर तृतीय क्रमांक तर कुमार गटात चित्रकला स्पर्धेत सिध्दवेद कुलकर्णी प्रथम क्रमांक, विनित रावले द्वितीय क्रमांक, तर हस्ताक्षर स्पर्धेत सिध्दवेद कुलकर्णी याने प्रथम क्रमांक मिळविला.
यासर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. तसेच महिलांसाठी घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत सौ.साक्षी रावले प्रथम क्रमांक तर निलांबरी कुलकर्णी द्वितीय क्रमांक मिळाला.बालगटातून प्रिन्स बोडवे प्रथम क्रमांक तर सिध्दवेद कुलकर्णी द्वितीय क्रमांक, पुरुष गटातून संदिप रावले प्रथम क्रमांक तर यशवंत लाड द्वितीय क्रमांक मिळाला तसेच बालगटातून प्रिन्स बोडवे प्रथम क्रमांक व सिध्दवेद कुलकर्णी द्वितीय क्रमांक मिळाला.
या स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यानंतर साळशी- झरीचीवाडी येथील श्री संत सतपुरुष काळकाई देवी प्रासादिक भजन मंडळ यांचे सुस्वर भजन झाले. या सर्व कार्यक्रमास सुखशांती मंडळाचे आजी- माजी पदाधिकारी, तसेच ग्रामस्थ, महिला भगिनी आधी मोठ्या संखेने सहभागी झाल्या होत्या.