निबंध स्पर्धेत सिध्दी वारीक - चिञकला स्पर्धेत मंथन जाधव प्रथम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 12, 2024 13:47 PM
views 116  views

देवगड : देवगड येथील माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी- हडपिड प्रशालेत तालुकास्तरीय निबंध व चिञकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी – हडपिड मुंबई आयोजित, हडपिड गावचे सुपुत्र श्री. सतीश विनायक राणे व त्यांच्या भगिनी सौ. रमा शिंदे यांनी आपले वडिल कै.विनायक सिताराम राणे यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी- हडपिड येथे तालुकास्तरीय निबंध व चिञकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये अनुक्रमे

निबंध स्पर्धेत ( प्राथमिक गट) सिद्धी मनेश वारिक प्रथम क्रमांक (पडेल हायस्कूल), मनस्वी संतोष खरात द्वितीय क्रमांक(मुटाट हायस्कूल),सुकन्या सुरेंद्र पवार तृतीय क्रमांक(शिरगांव हायस्कूल), सानिका सुरेंद्र चौकेकर उत्तेजनार्थ क्रमांक (माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी – हडपिड) यांचा आला.

माध्यमिक गटात स्नेहल सुहास गोडे प्रथम क्रमांक (पेंढरी हायस्कूल),पल्लवी शिवराज पुट्टेवाड द्वितीय क्रमांक(किंजवडे हायस्कूल),चंदना सुनील पवार तृतीय क्रमांक( शिरगांव हायस्कूल), मानसी निशिकांत सुतार उत्तेजनार्थ क्रमांक,(माध्यमिक शिक्षण शाळा, कोळोशी – हडपिड) यांना मिळाला.

चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गट(पाचवी व सहावी)मंथन सचिन जाधव प्रथम क्रमांक(शिरगांव हायस्कूल शिरगांव), वरद विठ्ठल दराडे द्वितीय क्रमांक(तळेबाजार हायस्कूल), पार्थ विजय गुरव तृतीय क्रमांक(माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी- हडपिड ) यांना देण्यात आला.

तसेच माध्यमिक गट( सातवी व आठवी) हर्ष प्रवीण वाडेकर प्रथम क्रमांक (वाडा हायस्कूल), वेदांत विठ्ठल दराडे द्वितीय क्रमांक (तळेबाजार हायस्कूल), वैभवी अंबाजी लाडगावकर तृतीय क्रमांक(शिरगांव हायस्कूल)यांना देण्यात आला.

तसेच माध्यमिक गटात ( नववी व दहावी) निखिल नंदकुमार मेस्त्री प्रथम क्रमांक( मुटाट हायस्कूल),शुभम लक्ष्मण खरात द्वितीय क्रमांक (शिरगांव हायस्कूल), आर्या सत्यवान जोईल तृतीय क्रमांक( किंजवडे हायस्कूल) यांना मिळाला.

निबंध स्पर्धेचे परिक्षण डी. जे.चव्हाण व एस. आर. जोईल यांनी केले.तर चित्रकला स्पर्धेचे परिक्षण सागर पांचाळ व प्रसाद राणे यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

बक्षिस वितरण कार्यक्रम शाळा समिती अध्यक्ष किशोर राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अथिती डाॅ.राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.कार्यकारी सदस्य सुशील इंदप, शाळा समिती सदस्य चंद्रकांत शिंदे, संतोष चव्हाण, शिवाजी गुरव, सतीश राणे, रमा शिंदे, राजेंद्र शिंदे शिक्षक वर्ग, पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. गर्जे,पाहुण्यांची ओळख व स्वागत मुख्याध्यापक करडे केले. तर आभार किशोर राणे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक व इतर  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग आदींनी स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये मोलाचे योगदान दिले.