श्री गणेश तरुण मित्रमंडळाच्या रील स्पर्धेचा सिद्धेश चव्हाण विजेता

शिवसेना उपनेते संजय आंग्रेंच्या हस्ते बक्षीस वितरण
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 15, 2025 12:45 PM
views 25  views

कणकवली : कणकवली येथे श्री गणेश तरुण मित्र मंडळ आयोजित रील स्पर्धेचे  बक्षीस वितरण‌ शिवसेना संजय आंग्रे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.‌

स्पर्धेत सिद्धेश चव्हाण याने प्रथम अथर्व रेवडेकर याने द्वितीय प्रथम जानकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कार्यक्रमास युवा सेना सिंधुदुर्ग सचिव नीलेश मेस्त्री, युवा सेना तालुकाप्रमुख सौरभ सुतार, राज पटेल, तसेच मंडळाचे पदाधिकारी, स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संजय आंग्रे म्हणाले, अशा उपक्रमांमुळे तरुणाईला आपली कला आणि कल्पकता सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट मंच मिळतो. समाजातील सकारात्मकता आणि संस्कार वृद्धिंगत करण्यासाठी हे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा सांस्कृतिक आणि सृजनशील उपक्रमांना माझे नेहमीच सहकार्य राहील, असे आंग्रे म्हणाले.