श्वेता शिवलकर देवगड मंडळ भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षपदी !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 12, 2024 13:51 PM
views 152  views

देवगड : कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार देवगड मंडल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष उषःकाला केळकर यांच्या शिफारशीनुसार देवगड मंडल भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षपदी तळवडे (तळेबाजार, बागतळवडे) ग्रामपंचायत माजी सरपंच श्वेता संदेश शिवलकर यांचे नियुक्ती करण्यात आली.

देवगड आमदार संपर्क कार्यालयात देवगड तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा उष:कला केळुसकर यांनी नुकतेच त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा प्रियंका साळसकर, माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी,माजी जि. प. सदस्या मनस्वी घारे, विद्यमान नगरसेविका तसेच महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.