
कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालडी शाखाप्रमुख पदी श्रीकांत खोत,तर उपशाखाप्रमुख पदी प्रथमेश पराडकर यांची निवड करण्यात आली आहे. आज कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.यावेळी त्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित शाखाप्रमुख श्रीकांत खोत म्हणाले, मालडी गावातील शिवसेना संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करून आ.वैभव नाईक यांना येणाऱ्या विधानसभेत जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी अरुण लाड ,नितीन पवार,अरविंद साटम,विठ्ठल घाडी , महेश पराडकर , आडवली-माडली युवासेना शाखाप्रमुख प्रविण सावंत,नितीन पवार ,प्रविण परब, लक्ष्मण घाडी, कैलास घाडी,नरेश सावंत ,विलास पराडकर ,सुभाष पराडकर, तुषार पराडकर,गणेश पराडकर ,सुशील पराडकर,हर्ष पराडकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.