श्रीराम विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचं ग्रेड परीक्षेत घवघवीत यश !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 08, 2024 13:43 PM
views 117  views

देवगड : सन २०२३-२४ साठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखकला परीक्षेत श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेची एकूण ७० विद्यार्थी प्रविष्ठ झाली होती त्यापैकी एलेमेंट्री ( पहिली ) परीक्षेला ३२ विद्यार्थी  प्रविष्ठ झाले त्यातील ३१ विद्यार्थी पास होऊन निकाल ९६.८७% लागला व इंटरमीजिएट ( दुसरी ) परीक्षेला ३८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले त्यातील ३४ विद्यार्थी पास होऊन निकाल ८९.४७ % लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे कला शिक्षक दत्ताराम कोकरे सर यांचे अभिनंदन केले आहे.

निकाल खालील प्रमाणे

एलिमेंट्री परीक्षा ( पहिली परीक्षा)

B श्रेणी  ४ विद्यार्थी, C श्रेणी २७ विद्यार्थी

इंटरमीजेट परीक्षा( दुसरी परीक्षा)

B श्रेणी ५  विद्यार्थी, C श्रेणी  २९ विद्यार्थी

फोटो - शासकीय रेखा परीक्षा २०२३ मध्ये उज्वल यश संपादन केलेले विदयार्थी