
सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर आणि स्वर्गीय अॅड. दीपक नेवगी कुटुंबिय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन मंदिरला १७३ वर्षे पूर्ण होत असल्याने शुक्रवारी वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला.
या निमित्ताने कै. अॅड. दीपक नेवगी स्मृती पुरस्कारान ज्येष्ठ कीर्तनकार विश्वनाथ मंगेश उर्फ भाऊ नाईक यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण श्रीराम वाचन मंदिर येथे पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विशेष कार्यकारी अधिकारी शहजान शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, डॉ. जी.ए.बुवा आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ज्येष्ठ कीर्तनकार विश्वनाथ नाईक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याला साथसंगत शहाजान शेख, बंड्या धारगळकर आदींनी केली.