मळगाव भूतनाथ मंदिरात होणार ‘श्रीराम पूजन’ !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2024 08:29 AM
views 167  views

सावंतवाडी : अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथील भूतनाथ मंदिर येथे प्रभू ‘श्रीराम पूजन’ कार्यक्रमाचे आयोजन मळगाव येथील समस्त हिंदू बांधवाच्यावतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने २२ रोजी सकाळी ८ वाजता भूतनाथ मंदिरकडील रामाच्या पाषाणाचे पूजन, ९ वाजता पूर्ण गावात ढोल ताशांच्या गजरात भक्तीमय शोभायात्रा, त्यानंतर सामूहिक महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना मळगाव येथील हिंदू बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव येथील हिंदू बांधवांच्यावतीने करण्यात आले आहे.