
देवगड : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपा मराठे ह्या नियत वयोमानानुसार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त झाल्याने त्यांना विद्या विकास मंडळ व श्री. मो. गोगटे प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष ॲड. अजितराव गोगटे ,संस्था सचिव प्रवीण जोग , नूतन मुख्याध्यापक .संजय गोगटे , नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री.ढाले,.प्रकाश मराठे, श्री.रघुनाथ काळे,. महेश रानडे, .राहुल गोगटे, सौ.मृणाल जोग, माजी मुख्याध्यापक . माधव खाडीलकर.राजेंद्र वालकर , ,श्रीम. नम्रता तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.