कोलझर इथं श्री देवी माऊली वर्धापनदिन सोहळा उद्या

Edited by:
Published on: March 26, 2026 11:33 AM
views 32  views

दोडामार्ग : कोलझर येथील श्री देवी माऊलीचा वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी 27 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता देव आगमनाने होणार असून सकाळी 9 वाजता सनवग्रह माऊली पंचायतन होम पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता सत्यनारायण महापूजा होणार आहे.

दुपारी 2 वाजता देवीची ओटी भरणे व महाआरती होईल, तर दुपारी 2.30 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

संध्याकाळी 7 वाजता ग्रामस्थांचे भजन होणार असून रात्रौ 9 वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचे नाटक सादर होणार आहे. त्यानंतर रात्री 12.30 वाजता पालखी सोहळा पार पडणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे