श्री देव रामेश्वराचा चतुःसीमा कार्यक्रम ९ ते १४ फेब्रुवारीला

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 05, 2025 11:12 AM
views 38  views

मालवण : कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेला स्वयंभू देव रामेश्वर पालखी, तरंग, राणे- परब मानकरी आणि रयत मंडळींसह वाजत गाजत चतुःसीमा (वेशी फिरणे) कार्यक्रम ९ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे.


९ फेब्रुवारी रोजी रामेश्वर मंदिर कांदळगाव येथून दुपारनंतर कोळंब मांगरी येथे प्रस्थान, १० फेब्रुवारी रोजी कोळंब मांगरी येथील श्री देव महापुरुष येथे प्रस्थान, दुपारी महाप्रसाद, दुपारनंतर न्हिवे येथे प्रस्थान, त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी न्हिवे येथे दुपारी महाप्रसाद, दुपारनंतर महान येथे प्रस्थान, १२ फेब्रुवारी रोजी दुपारी महान गांगेश्वर मंदिर येथील येथे महाप्रसाद, दुपारनंतर कांदळगाव सातेरी मंदिरकडे प्रस्थान, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी सातेरी मंदिरातून कांदळगाव साळकरवाडी येथे प्रस्थान, तेथून पुन्हा माघारी येताना परबवाडी मोठ्या तुळशीजवळ महाप्रसाद, दुपारनंतर रवळनाथ मंदिराकडे प्रस्थान, १४ फेब्रुवारी रोजी रवळनाथ मंदिर येथून राणेवाडी येथे प्रस्थान, दुपारी राणेवाडी मध्यवर्ती मोठी तुळस येथे महाप्रसाद दुपारनंतर रामेश्वर मंदिर येथे रवाना, रात्री रामेश्वर मंदिर येथे पाच दिवसीय वेशी फिरणे कार्यक्रमाची रितीरिवाजानुसार सांगता करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कांदळगाव रामेश्वर देवस्थानातर्फे करण्यात आले आहे.