
देवगड : देवगड तालुक्यातील दाभोळे येथील श्री. देव गांगेश्वर पावणाई भावई मंदिर,येथील सप्त प्रहारांचा" वार्षिक अखंड हरीनाम सप्ताह "भागवत एकादशी रविवार दि. ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न होत आहे.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल यावेळी सुरू असलेली यावेळी पाहायला मिळणार आहे. यावेळी मंदिरामध्ये २ नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्याच्या प्रबोधिनी एकादशी दिवशी सप्त प्रहरांचा हरिनाम सप्ताह सकाळी ८.वाजल्या पासून (जत्रोत्सव) सुरू होणार आहे. यावेळी दिंडीचे कार्यक्रम तसेच भजने आदी कार्यक्रम होणार असून या हरीनाम सप्ताहास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या हरीनाम सप्ताहाची शोभा वाढवावी असे श्री देव गांगेश्वर पावणाई भावई मंदिर, मु. पो. दाभोळे, तालुका देवगड, जिल्हा - सिंधुदुर्ग यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.











