देवगडात शुक्रवारपासून 'दत्त' नामाचा जयघोष !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 18, 2023 12:15 PM
views 84  views

देवगड : तालुक्यातील वाडा येथील श्री दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जयंती महोत्सव मार्गशीष शुक्ल १० शके १९४५ शुक्रवार २२ डिसेंबर ते गुरुवार २८ डिसेंबर २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्यात सहभागी व्हावे असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

या सोहळ्यानिमित्त नियमित महापूजा, अभिषेक, महानैवेद्य, महाप्रसाद ,आरती मंत्रपुष्प आदि धार्मिक कार्यक्रम होतील. तसेच प्रवेश प्रवचन सेवा ह.भ.प. श्रीकृष्ण गणेश घाटे पडेल, कीर्तन सेवा ह. भ. प. वासुदेव जोशी औदुंबर २२ व २३ डिसेंबर व ह .भ. प .श्री मोहक बुवा रायकर डोंबिवली २४ ते २८ डिसेंबरला आयोजिले आहे. मंगळवार २६ डिसेंबर २०२३ श्री दत्त जयंती जन्मोत्सव सोहळा, सायंकाळी ३.३० ते ७ व रात्री ९ ते १० आरती, मंत्र पुष्प. रात्री १० वाजता गायन सेवा 'स्वर कृष्णेच्या काठी' चं आयोजन केलं असून राजाभाऊ शेंबेकर चिपळूण गीत सादर करणार आहेत. त्यांना ऑर्गन साथ हर्षल काटदरे चिपळूण, तबला साथ प्रथमेश देवधर चिपळूण करणार आहेत. या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुधाकर राम पाटणकर श्री दत्त मंदिर वाडा यांनी केले आहे.