श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, तिथवली शाळेचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 09, 2025 20:19 PM
views 96  views

वैभववाडी : तिथवली येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर १ या जि.प.प्राथमिक शाळेने सन २०२५ मधील घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या प्रशालेची रोझाना गुलझार काझी हीने एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना शाळेच्यावतीने बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये विविध सामाजिक संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यातील एसटीएस व अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षेत तिथवलीतील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. एसटीएस परीक्षेत अर्णवी सचिन झाटे (इयत्ता तिसरी) १६८ गुण सुवर्ण पदक, रोझान गुलजार काझी (इयत्ता चौथी) १६८ गुण सुवर्ण पदक, वैष्णवी पांडुरंग हरयाण (इयत्ता चौथी)– १३४गुण कांस्य पदक प्राप्त केले. तसेच रोझान गुलजार काझी हीने अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षेत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला. स्वरा बाळकृष्ण किणेकर हिने तालुक्यात प्रथम दहा विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान मिळवला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यीनींचा शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रोहीणी कुडाळकर, मुख्याध्यापक अंकुश सुतार, शिक्षिका सौ.सुतार, पालक गुलझार काझी, शिक्षक व पालक उपस्थित होते.