
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ठाणे विभाग गट कार्यालय चिपळूण आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या गटस्थरिय भजन स्पर्धेत श्री ब्राह्मणदेव प्रासादिक महिला भजन मंडळ, बुवा प्रियंका तवटे यांना प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कामगार कल्याण केंद्र कणकवली मार्फत नगर वाचनालय हॉल कणकवली येथे गटस्तरीय महिला भजन स्पर्धा आज आयोजित करण्यात आली. पोफळी, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी,पिंगुळीवसाहत कुडाळ,महाड, मालवण अशा एकूण आठ संघानी सादरीकरण केले. स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजेता ठरलेला कामगार कल्याण मालवण हा संघ जानेवारी मध्ये हुतात्मा दिनानिमित्त रंगणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी कोकण गटातून मिळाली. तर द्वितिय परितोषिक कामगार कल्याण केंद्र महाड व तृतिय परितोषिक कामगार कल्याण केंद्र सावंतवाडी संघाने पटकावले. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण संगीततज्ञ प्रा शाहीर हरीभाऊ भिसे, मोहन मेस्त्री व तेजस्विता तेंडूलकर यांनी केले .
वैयक्तीक बक्षिसामध्ये उत्कृष्ठ तालसंचन प्रथम पोफळी संघ, व्दितिय कुडाळ संघव तृतिय मालवण सर्वोत्कृष्ठ हार्मोनियम प्रथम कविता चव्हाण कुडाळ, व्दितिय दिव्या गोसावी महाड, तृतीय ऋतुजा सावंत सावंतवाडी, सर्वोत्कृष्ठ गायिका प्रथम प्रियांका तवटे मालवण, व्दितिय स्नेहा आठवले पोफळी, तृतिय दिव्या गोसावी महाड यांनी पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या भजन संघातील पखवाज वादक विराज राणे, तबलावादक हर्षद मेस्त्री, कोरससाठी
साक्षी झोरे, नेहा देसाई, निधी पवार, काव्या पवार, मानवी देसाई, ईश्वरी करगुटकर, भूमिका वायगणकर, आणि दिव्या वायगणकर. यांनी उत्तम प्रकारे साथ दिली.
विजेत्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज अध्यक्ष राजश्री साळुंखे, कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील, कामगार अधिकारी सुवर्णा पाटील शिंदे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी कामगार अधिकारी राजेंद्र निकम व आभार केंद्रसंचालक संतोष नेवरेकर यांनी केले.










