
सिंधुदुर्ग : राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धेत श्रेया चांदरकर हीच्या कलाकृतीचे कौतुक करण्यात आले. २ ते ७ जानेवारी २०२५ या कालावधीत भोपाळ मध्यप्रदेश इथे पार पडलेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची विद्यार्थिनी श्रेया समीर चांदरकर हिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत दृश्यकला प्रकारात सागरी जलप्रदूषण या विषयावर आधारित त्रिमित शिल्प तयार केले.
जगभरात प्लास्टिकमुळे होणारे जलप्रदूषण, वायु प्रदूषण ध्वनी प्रदूषण यामुळे संपूर्ण जीवसृष्टीला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातही पृथ्वीच्या71 टक्के भूभागाने व्यापलेल्या महासागरांचे प्लास्टिकमुळे तसेच जहाजांमधील तेलगळतीने होणाऱ्या प्रदूषणामुळे प्रचंड नुकसान होत आहे. या प्रदूषणामुळे अनेक सागरी जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.महासागरात होणाऱ्या प्रदूषणाचे गांभीर्य दर्शवीणारे त्रिमित शिल्प श्रेया हिने साकारले, यात समुद्र मातेच्या हातामध्ये प्लास्टिक बॉटलमध्ये अडकलेला मासा, टायर मध्ये अडकलेला ऑलिव्हरीडले कासव, जहाजांमुळे होणारे प्रदूषण अशी सुंदर मांडणी केली, समुद्र मातेच्या चेहऱ्यावरील करुण भाव पाहणाऱ्याला अंतर्मुख करीत होते.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने स्वच्छता अभियानात पुढाकार घेतला आहे. स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत सागरी किनारे स्वच्छ करण्याची मोहीम समुद्रकिनारी राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शालेय विद्यार्थ्यांचे स्वच्छता संदेश देणारे कट आउट लावून या अभियानातील सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न श्रेया हिने आपल्या कलाकृतीतून केलेला आहे. या विद्यार्थिनीला कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर यांनी मार्गदर्शन केले.श्रेयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक,देवयानी गावडे, व सर्व शिक्षकानी कौतुक केले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त- कर्नल (सेवानिवृत्त )शिवानंद वराडकर ,ऍड.एस एस पवार , अध्यक्ष अजयराज वराडकर,उपाध्यक्ष आनंद वराडकर,शेखर पेणकर ,सचिव-सुनिल नाईक ,विजयश्री देसाई,सहसचिव साबाजी गावडे ,खजिनदार रविंद्रनाथ पावसकर ,सर्व संचालक ,शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, यांनी श्रेया व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.