श्रावणा मास भजन स्पर्धेत श्री सिद्धेश्वर सातेरी भजन मंडळ प्रथम

श्री ब्राम्हणदेव भजन मंडळ द्वितीय
Edited by: विनायक गावस
Published on: August 21, 2023 19:01 PM
views 52  views

सावंतवाडी : श्री सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ, तळवडे व ग्रामस्थ यांच्यावतीने नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देऊन व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तळवडे,होडावडे,मातोंड,पेंडूर,निरवडे गाव मर्यादित तसेच २५ वयोगटाखालील श्रावण मास भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्री सिद्धेश्वर सातेरी भजन मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक श्री ब्राम्हणदेव भजन मंडळ,तृतीय क्रमांक श्री क्षेत्रपालेश्वर भजन मंडळ,यांनी पटकावला.याचबरोबर चतुर्थ क्रमांक इसोटी भजन मंडळ तर उत्तेजन्नार्थ प्रथम क्रमांक भूतनाथ भजन मंडळ, उत्तेजनार्थ द्वितीय अष्टविनायक भजन मंडळ यांनी मिळविला असून अनुक्रमे बाळा दळवी व पंढरीनाथ मांजरेकर यांनी पारितोषिक व सन्मानचिन्ह पुरस्कृत केली होती.तसेच या स्पर्धेत शिस्तबद्ध संघ म्हणून उदिन्नाथ भजन मंडळ यांनी मिळविला.

    उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे 

       उकृष्ट हार्मोनियमवादक अदिती परब ( कुलदेवता भजन मंडळ,मातोंड ) उकृष्ट पखवाजवादक विभायून,अर्थव,आपा गुळेकर,कृष्णा परब ( सिद्धेश्वर सातेरी भजन मंडळ )उकृष्ट गायक स्वप्निल गावडे ( भूतनाथ भजन मंडळ निरवडे ) उकृष्ट तबलावादक रितेश गावडे ( जय भवानी भजन मंडळ तळवडे ) उकृष्ट झांजवादक संकेत मेस्री ( जय भवानी भजन मंडळ तळवडे ) उकृष्ट कोरस ( कुलदेवता भजन मंडळ पेंडूर घोडेमुख ) उकृष्ट टाळवादक ( खळदकर भजन मंडळ ( परबवाडी ) उकृष्ट वेशभूषा ( जय भवानी भजन मंडळ बांदेवाडी ) उकृष्ट अंभग ( सिद्धेश्वर भजन मंडळ ) उकृष्ट गजर ( अष्टविनायक भजन मंडळ ) उकृष्ट गौळण ( जय भवानी भजन मंडळ ) उकृष्ट रुपावली ( नवयुवक भजन मंडळ ) उकृष्ट नोटेशन ( ब्राम्हणदेव भजन मंडळ ) उकृष्ट प्रार्थना इसोटी भजन मंडळ यांनी मिळविला. या स्पर्धेला एकूण १३ संघानी सहभाग घेतला तसेच या स्पर्धेचे परिक्षक म्हणून वैभव परब व अमेय गावडे  यांनी काम पाहिले.