श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्‍ताने अणसूरात कार्यक्रम !

Edited by: दिपेश परब
Published on: January 25, 2024 06:34 AM
views 188  views

वेंगुर्ले : २२ जाने रोजी संपन्न झालेल्या प्रभू श्री राम प्राण प्रतिष्‍ठा सोहळ्याच्या निमित्‍ताने अणसूर गावातील सातेरी मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. 

    सकाळी  ९.०० वाजता श्री देवी सातेरीची  विधिवत  पूजा करू न  अभिषेक  करण्‍यात आला. ११.३० पासून राम मंत्र पठण करण्‍यात आले. दुपारी  १.०० वाजता  महाआरती  तर दुपारी  ३.०० वाजल्‍यापासून रांगोळी  स्‍पर्धा, संगीत खुर्ची,  डान्‍स स्‍पर्धा, भजन  व  फुगडी  इत्‍यादी  कार्यक्रम  घेण्‍यात आले. तसचे  संध्‍याकाळी ७  वाजता  दिपोत्‍सव  करण्‍यात  आला.  रांगोळी  स्‍पर्धेचे  उद्घाटन भाजप  युवा  मोर्चा  प्रदेश उपाध्‍यक्ष प्रथमेश तेली यांच्‍या हस्‍ते फित  कापून करण्‍यात आले.

रांगोळी  स्‍पर्धेमध्‍ये १८ स्‍पर्धकांनी भाग  घेतला. संगीत खुर्ची मध्‍ये ५५ स्‍पर्धकांनी  भाग  घेतला व  डान्‍स स्‍पर्धेमध्‍ये ८  स्‍पर्धकांनी  भाग  घेतला.   रांगोळी  स्‍पर्धा प्रथम  क्रमांक  चरित्रा राऊळ, व्दितीय क्रमांक रूचिता  रामचंद्र  गावडे, तृतीय क्रमांक  रूचिता गजानन देऊलकर , उत्‍तेजनार्थ अनुष्‍का  राणे व अन्‍नपूर्णा गावडे, डान्‍स स्‍पर्धा प्रथम क्रमांक अभंग  अमित रगजी, व्दितीय क्रमांक काजल तुकाराम गावडे, तृतीय क्रमांक तेजल तुळशीदास गावडे,   संगीत खर्ची प्रथम क्रमांक गौरी गोविंद गावडे, व्दितीय क्रमांक दिव्‍या दिलिप मालवणकर, तृतीय क्रमांक अनुष्‍का राणे यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी समस्त गावकर मंडळी, ग्रामपंचायत सदस्‍य, ग्रामस्‍थ उपस्थित होते. या  संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन  अणसूर  ग्रामपंचायत सरपंच सत्‍यविजय गावडे, अणसूर  ग्रामस्‍थ व  आयोजक  मित्रमंडळीयांनी  उत्‍तम  रित्‍या  केले त्‍यांचे.