कणकवली 'राममय' !

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 22, 2024 05:41 AM
views 166  views

कणकवली : अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी असणाऱ्या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कणकवली शहरात देखील प्रत्येकाने आपल्या दरवाजा पुढे गुढी उभारून श्रीराम नामाचे  झेंडे लावले आहेत तर काही रामभक्तांनी प्रभू श्री राम लक्ष्मण व सीतामाताचा देखावा देखील उभारला आहे त्यामुळे कणकवलीत वातावरण श्रीराम झाले आहे.