सावंतवाडीत 'रामरंग' !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2024 10:04 AM
views 68  views

सावंतवाडी : श्रीराम जन्मभूमी अयोध्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा या कार्यक्रमाचे औचित्य साधून नाम. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ आयोजित व रघुकुल स्वरविहार, सावंतवाडी प्रस्तुत 'रामरंग' कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. यात सौ. ईश्वरी तेजम, पल्लवी पिळणकर, ऋचा कशाळीकर, सानिका गावडे  गीत सादर करणार आहेत.

तरसंवादिनी साथ उमेश परब, सावंतवाडी, तबला साथ प्रसाद मेस्त्री, नेरुर, पखवाज साथ आनंद मोर्ये, आंदुर्ले करणार आहेत. तसेच यानंतर ह.भ.प. ऋचा संजय पिळणकर, माणगाव यांचे 'रामराज्याभिषेक' या विषयावर सुश्राव्य कीर्तन होणार असून संवादिनी साथ पल्लवी संजय पिळणकर, तबला साथ जस्मित संजय पिळणकर करणार आहेत. सोमवार २२ जानेवारी २०१४ रोजी सायं. ५.३० वा. श्री देव विठ्ठल मंदिर, सावंतवाडी येथे हे कार्यक्रम होणार आहेत