
सावंतवाडी : महाराष्ट्र, गाेवा, कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व 365 खेडयांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा साेहळ्यास गुरुवारी प्रारंभ झाला. देव उपरलकराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी माेठा उत्सव म्हणून साजरा हाेताे. यावर्षीही सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले होते. सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ पार पडला. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक येथील भाविकांनी श्री देव उपरलकराच्या दर्शनासाठी सावंतवाडीत हजेरी लावली होती.दरम्यान, या निमित्ताने नामांकीत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम व महापुरुष दशावतार नाटयमंडळाचा नाटयप्रयाेग हाेणार आहे.