श्री देव ईसवटी भजन मंडळ टेंबवाडीचा भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक !

न्हावेलीतील श्री देव माऊली मंदिरात युवा ग्रुपचं आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2023 19:01 PM
views 53  views

सावंतवाडी : न्हावेली येथील श्री देव माऊली मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त युवा ग्रुपने आयोजित केलेल्या गावमर्यादित भजन स्पर्धेत श्री देव ईसवटी भजन मंडळ टेंबवाडी ( बुवा - सत्यवान गावडे ) याने प्रथम क्रमांक मिळविला‌. तर द्वितीय क्रमांक पंचदेवी भजन मंडळ,पार्सेकरवाडी (बुवा - सुरज पार्सेकर ) तृतीय क्रंमाक श्री देवी भवानी भजन मंडळ,रेवटेवाडी ( बुवा- अक्षय जाधव ) यांनी प्राप्त केला. 

तर उत्तेजनार्थ श्री विघ्नहर्ता भजन मंडळ,दळवी परिवार ( बुवा- कमलेश दळवी ) यांना मिळाला.  स्पर्धेत उकृष्ट झांज- मयूर निर्गुण ( सिद्धिविनायक भजन मंडळ, चौकेकरवाडी ) उकृष्ट कोरस - ( प्रासादिक भजन मंडळ,देऊळवाडी - उदय परब ) उकृष्ट तबला - रविंद्र दळवी ( श्री विघ्नहर्ता भजन मंडळ, दळवी परिवार ) उकृष्ट पखवाज - भूषण पार्सेकर ( पंचदेवी भजन मंडळ , पार्सेकरवाडी ) उकृष्ट हार्मोनियम - सत्यवान गावडे ( श्री देव ईसवटी भजन मंडळ,टेंबवाडी ) उकृष्ट गायक - सुरज पार्सेकर ( पंचदेवी भजन मंडळ, पार्सेकरवाडी ) यांना मिळाला.

एकूण ७ भजन संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून संगीत अलंकार दिप्तेश मेस्री यांनी केले. तर सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले.या स्पर्धेला रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.