कनकनगरीत सद्गुरू भालचंद्र बाबांची पुण्यतिथी !

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम ; कीर्तन महोत्सवालाही सुरुवात
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 16, 2023 16:39 PM
views 134  views

कणकवली : योगियांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा 46 व्या पुण्यतिथी महोत्सवास शुक्रवारी भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्त पुढील चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.आज शुक्रवारी पहाटे भालचंद्र महाराज यांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात आले. पहाटेच्या थंडीत भक्तांनी काकड आरती म्हणत वातावरण भक्तिमय केले. सकाळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात सर्व भक्तांच्या कल्याणार्थ भालचंद्र महारुद्र, महाभिषेक अनुष्ठान केला. यावेळी संस्थांचे अध्यक्ष तसेच संचालक कमिटी विश्वस्त व शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.


दुपारी भालचंद्र महाराज यांची ममहाआरती करण्यात आली. दुपारच्या सत्रात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भजनी कलाकारांनी सुश्राव्य भजने सादर करून वातावरण भक्तिमय केले. सायंकाळच्या सत्रात ह.प.भ. विश्वासबुवा कुलकर्णी यांचे संत तुळशीदास या विषयावर कीर्तन पार पडले. हे कीर्तन ऐकण्यासाठी श्रोते उपस्थित होते. भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त संस्थात परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भालचंद्र महाराज यांची मूर्ती व समाधी स्थळ आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे. भालचंद्र महाराजांचे हे मनमोहक सर्वांचे लक्षवेधून घेत होते.  भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवामुळे शहरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भालचंद्र महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी संस्थान परिसरात गर्दी दिसून आली