
ओरोस: ओरोस ग्रामपंचायतीने आज शिवाजी महाराज स्मारकाची स्वच्छता करून, हायवेच्या पुलाखालील खड्डे बुजवून एक आदर्श श्रमदान उपक्रम राबवला. या उपक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना हातभार लावला.
ग्रामपंचायतीने सुरुवातीला शिवाजी महाराज स्मारकाचा परिसर स्वच्छ केला. त्यानंतर ओरोस हायवेच्या ब्रिजखालील रस्त्याला पडलेले खड्डे सिमेंट आणि ग्रीटचा वापर करून भरले. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या उपक्रमात सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला कोणत्याही राजकीय हेतूचा स्पर्श नव्हता, तर गावच्या स्वच्छतेची आणि विकासाची भावना घेऊन सर्वपक्षीय लोक एकत्र आले होते. या एकजुटीने राबवलेल्या उपक्रमामुळे गावासाठी एक सकारात्मक संदेश गेला आहे.