
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या १० वी अर्थात शांलात परीक्षेचा सावंतवाडी तालुक्यातून कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या वेदिका ताटे हीने ९८.४० टक्के गुणांसह तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिच्या या घवघवीत यशानंतर कुटुंबियांंसह शाळेच्या शिक्षकांनी तीच तोंड गोड करत अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कळसुलकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर व शिक्षक वर्गाकडून वेदिकाच पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं. कुटुंबियांनी पेढा भरवत तीच्या या यशाचं कौतुक केलं. याप्रसंगी वेदीका म्हणाली, मेहनतीच सार्थक झाल्याचा आनंद वाटत आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश करून मी विज्ञान शाखा निवडणार आहे. त्यानंतर इंजीनियरिंग करण्याचं माझं स्वप्न आहे. अधिकचा क्लास मी करत नव्हते. शिक्षक व पालकांनी केलेल्या मार्गदर्शन व कुटुंबियांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे मी हे यश संपादित करू शकले. या याशाच सर्व श्रेय माझ्या आई वडीलांना व शिक्षकांना देऊ इच्छिते. तर मुख्याध्यापक एन पी. मानकर म्हणाले, कळसुलकर इंग्लिश स्कूलची उज्वल परंपरा कायम राखण्याच काम वेदिकाने केलं आहे. तिच्या पुढील उज्वल वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. याप्रसंगी कळसुलकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, कळसुलकर इंग्लिश स्कूलचे शिक्षक एस.पी. कुलकर्णी, एस. यू. बांदेलकर, एम. एम. कदम, वेदिकाचे वडील संजय ताटे, आई सायली ताटे, बहीण निधी ताटे आदी उपस्थित होते.