
कणकवली : बाजारपेठ मधील शिरसाट कापड दुकाना नजीक विद्युत तारा एकमेकांना चिकटल्याने शॉर्ट होत धूर येऊ लागल्याने येथील व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. यानंतर तातडीने कणकवली नगरपंचायत ला कल्पना देण्यात आली. त्यानंतर नगरपंचायतचा अग्निशमन बंब व गणेश लाड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र विद्युत पुरवठा सुरू असल्याने यावर काही उपाययोजना करता येत नव्हती. दरम्यान महावितरण चे कनिष्ठ अभियंता शिंदे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ दखल घेत वायरमन मार्फत विद्युत पुरवठा बंद करायला लावला. सुदैवाने या तारांमधून शॉर्ट सर्किट मुळे धूर येत असल्याचे निदर्शनास आल्याने अनर्थ टाळला. ही घटना आज सोमवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास घडली. अनेकांनी या ठिकाणी धाव घेतली होती. मात्र विद्युत पुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टाळला.