आगीच्या भक्षस्थानी दुकान

लाखो रुपयांचे नुकसान !
Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 20, 2023 12:40 PM
views 110  views

देवगड : देवगड तालुक्यातल्या जामसंडे येथील भगवती ट्रेडर्स या दुकानाला मध्यरात्री १२ च्या दरम्यान अचानक आग लागल्यामुळे दुकानामधील वस्तू आगीच्या भक्षस्थानी येऊन जळून खाक झाल्या. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लगतच्या ग्रामस्थांनी तसेच पटेल बंधूनी आटोकाट प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे दुकानातील सामानांचे मोठे नुकसान झाले. आगीचे कारण नेमके अद्यापही समजू शकले नाही. 

मालक पटेल हे नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. रात्री सव्वा बाराच्या सुमारास भगवती ट्रेडर्स दुकानाच्यावरील मजल्यावरील रहिवाशी यांनी दुकानांमध्ये आग लागल्याची माहिती दिली. मात्र दुकानाच्या ग्रीलमध्ये पाण्याच्या टाक्या, कलर सामान असल्यामुळे आतमध्ये जाणे शक्य नसल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती नगरपंचायत प्रशासनाला मिळताचं नगरपंचायतीचे कर्मचारी अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु विनोद पटेल यांच्या हार्डवेअरमध्ये असलेल्या बऱ्याच वस्तूंनी पेट घेतल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळतात नगरसेवक बुवा तारी, विशाल मांजरेकर स्थानिक व्यापारी पटेल बंधू तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यात विनोद पटेल यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.