शिरोड्यात ठाकरे सेनेला धक्का

सरपंच लतिका रेडकर यांचा शिवसेनेत प्रवेश
Edited by:
Published on: November 10, 2024 12:19 PM
views 401  views

वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सरपंच लतिका रेडकर यांनी सावंतवाडी विधानसभेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या हस्ते शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिरोड्यातुन ठाकरे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. सरपंच लतिका रेडकर या जनतेतून सरपंच म्ह्णून निवडून आल्या होत्या. यानंतर शिरोडा ग्रामपंचायतवर उबाठा शिवसेनेची सत्ता आली होती. दरम्यान दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरपंच लतिका रेडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, सुनील डुबळे, सुरज परब, भाजपचे शिरोडा ग्रा प सदस्य मयुरेश शिरोडकर, शिवसेना ग्रा प सदस्य जगन बांदेकर आदी उपस्थित होते.