दोडामार्गात शिंदे गटाला धक्का ; दोन्ही ग्रा. पं. भाजपकडे

Edited by: संदीप देसाई
Published on: October 17, 2022 17:05 PM
views 474  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात नुकत्याच झालेल्या झरे 2 व पाटये पुनर्वसन सासोली ग्रामपंचायत निवडणूकित शिंदे गट शिवसेनेला दे धक्का बसला आहे. झरे 2 पुनर्वसन मध्ये भाजप पृरस्कृत श्रुती देसाई या तर सासोली खुर्द पाटये पुनर्वसन ग्रामपंचायत वर प्रवीण गवस हे गावविकास पॅनलमधून निवडून येत थेट सरपंच पदी विजयी झालेले आहेत. दरम्यान या दोन्ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्या असून दोन्ही थेट सरपंच पदी विजयी झालेल्या उमेदवार श्रुती देसाई व प्रवीण गवस यांचं दोडामार्ग दौऱ्यावर असलेले भाजपा जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी  पुष्पहार घालून स्वागत व अभिनंदन केलं आहे. 

          तर विजयानंतर दोन्ही सरपंच यांच्या स्वागतासाठी उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाचे  तालुकाप्रमुख संजय गवस उपस्थित राहिल्याने भाजप व मूळ शिवसेना यांच्या छुप्या युतीबाबत तर्क वितर्क लडविले जात आहेत. दरम्यान एकूण सदस्य संख्येत मात्र दोन्ही ठिकाणी शिंदे गटाने सदस्य निवडीत वर्चस्व राखल्याचे सांगितले आहे. 

     दरम्यान या विजयानंतर  ग्रामपंचायतच्या सरपंच पदी निवडून आलेल्या श्रुती देसाई व प्रवीण गवस यांच्या निवडीनंतर या दोघांनाही दोडामार्ग दौऱ्यावर असलेल्या भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे पदाधिकारी एकनाथ नाडकर्णी, राजन म्हापसेकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मंडळ अध्यक्ष सुधिर दळवी, रंगनाथ गवस, प्रवीण गवस, आनंद तळणकर, अभिमन्यु कुबल, शंकर देसाई, समीर रेडकर आदी उपस्थित होते. 


दरम्यान दोडामार्ग मध्ये नगरपंचायत निवडणूक नंतर दोन गटात निर्माण झालेल्या वादावर जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी यशस्वी शिस्टाई केली. त्यानंतर दोन्ही गटांच्या सहकार्याने प्रत्येकानं एक-एक ग्रामपंचायत काबीज केल्याने आज भाजपचे वर्चस्व दोडामार्ग मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आले.