आचिर्णेत अतुल रावराणे यांना धक्का

दारये धनगरवाडी उ.बा.ठा च्या शेकडो कार्यकर्त्यांचा आ. राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 02, 2024 10:17 AM
views 610  views

वैभववाडी : आचिर्णे दारये धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी ठाकरे शिवसेनेची साथ सोडली.आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत येथील ग्रामस्थांनी (आज ता.२मे) भाजपात प्रवेश केला.आम.राणेंनी सर्वं ग्रामस्थांचे पक्षात स्वागत केले.तसेच विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अस आश्वासन दिले.शिवसेनेचे अतूल रावराणे यांच्या गावातच भाजपाने ठाकरे सेनेला जोरदार धक्का दिला आहे.

भाजपात गेले काही दिवस जोरदार इनकमिंग सुरू आहे.तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ व ठाकरे सेनेचे पदाधिकारी भाजपात प्रवेश करीत आहेत.आज आचिर्णे येथील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश केला आहे.गावात आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून गावात होत असलेल्या  विकास कामामुळे प्रभावित होऊन ग्रामस्थांनी हा प्रवेश केला आहे. येथील विठ्ठल हुंबे, गणपत हुंबे, अंबाजी हुंबे, बाळू गुरखे, गंगाराम गुरखे, दत्ताराम गुरखे, चंद्रकांत गुरखे, बबलू शिंगाडे, जनार्दन शिंगाडे, राजाराम झोरे, जनार्दन झोरे, चंद्रकांत झोरे, संतोष झोरे, जनार्दन बोडके, राजाराम शिंगाडे, प्रकाश शिंगाडे, वाघोबा झोरे, तुकाराम झोरे विठ्ठल काळे, रुपेश गुरखे, कौस्तुभ गुरखे गणेश गुरखे, शांताराम झोरे विश्वास झोरे नितेश झोरे अक्षय झोरे शरद बोडके बाळकृष्ण झोरे दिलीप झोरे दीपक बोडके दीपक शिंगाडे दशरथ झोरे गौरव झोरे विक्रांत झोरे गणपत झोरे, सारस बोडेकर, विकास झोरे, राजाराम शिंगाडे, जय बोडके, दक्ष शिंगाडे, सिताराम झोरे राजाराम बोडके सखाराम झोरे संतोष झोरे यांनी आमदार  राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.यावेळी नासीर काझी, दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे,आदेश रावराणे ,समीर रावराणे, कमलेश रावराणे ,आर.डी. बोडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.