दोडामार्गात शिवसेनेन लावलाय विकासकामं भूमिपूजनाचा धडाका

कुडासे भरपालवाडीत दोन रस्ते व कुडासे राऊळवाडीत स्मशानभूमी कामांचे भूमिपूजन
Edited by: संदीप देसाई
Published on: January 12, 2024 10:51 AM
views 74  views

दोडामार्ग : कुडासे भरपालवाडी येथील दोन  रस्त्याचे व कुडासे राऊळवाडी येथील  स्मशान भूमीचे भूमिपूजन शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शिवसेना जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, कुडासे  गावच्या प्रथम नागरिक सरपंच पुजा  देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. 

   यावेळी उपतालुकाप्रमुख दादा देसाई,  विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, युवा सेना प्रमुख भगवान गवस, उपसरपंच  नीलेश देसाई, ग्रामपंचायत सदस्य  प्रसाद कुडासकर, नम्रता देसाई  भरपाल येथील ज्येष्ठ नागरिक भाऊ देसाई, राजन परब,  सुनील  राऊत,  नामदेव देसाई  दीपक  राऊळ  ठेकेदार जंगले व मोठ्याप्रमाणात  भरपाल व राऊळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. 

  कुडासे भारपालवाडी रस्त्याची तेथील ग्रामस्थांनी सातत्याने मागणी केली होती. ही मागणी शिवसेना पदाधिकारी यांनी मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून पूर्ण केली. तर येथील आवश्यक असलेला स्मशानभूमी बांधणीचा प्रश्नही मार्गी लावला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतनिधींनीही शिवसेना आणि तालुक्यातील पदाधिकारी आमदार तथा मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत.