
सावंतवाडी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने झाराप येथील जिवदान शाळेत ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आणि पदाधिकारी यांनी भेट देऊन मुलांना खाऊ वाटप करत आर्थिक मदतीचा हात पुढे केला. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ ,उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसूजा, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत परब उपतालुकाप्रमुख सोनू दळवी, उमेश नाईक, अशोक धुरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शाळेत गतिमंद मुलांना शैक्षणिक ज्ञान दिले जाते.या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करताना संस्थेला आर्थिक मदत देण्यात आली.