निवडणुकीच्या निकालानंतर वैभववाडीत ठाकरे सेनेत धुसफूस

अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत
Edited by:
Published on: November 25, 2024 19:40 PM
views 196  views

वैभववाडी : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे सेनेत धुसफूस सुरू आहे.वैभववाडी तालुक्यात हा पराभवाचे पडसाद उमटले आहेत.लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी यांनी तालुका प्रमुखांकडे आपले राजीनामे दिले आहेत. ठाकरे शिवसेनेत येत्या काही दिवसांत राजकीय भुकंप होण्याची शक्यता अधिक आहे.अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत.