
रत्नागिरी : सिंधुरत्न समृध्द योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते *किरण (भैय्या) सामंत* यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लांजा तालुक्यातील आसगे जिल्हा परिषद गटातील कणगवली शिंदे वाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षाच्या युवानेत्या सौ.अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. या कार्यक्रमावेळी शिवसेना लांजा तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, उप तालुका प्रमुख सुजित आंबेकर, तालुका सचिव वसंत घडशी, महिला विधानसभा क्षेत्र प्रमुख सौ. मानसी आंबेकर, तळवडे शाखा प्रमुख वैभव पाटोळे, बूथ प्रमुखा आणि तळवडे उपसरपंच प्रसाद उपशाखा प्रमुख अजहर पावसकर, गाव शाखा संघटक अनिल पांडुरंग शिंदे, अनिल शिंदे, सुहास मांडवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. गावाच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला असून आगामी विधानसभा निवडणुकीत किरण (भैय्या) सामंत यांना जास्तीत जात मताधिक्य आमच्या गावातून मिळवून देऊ असा निर्धार या सर्व ग्रामस्थांनी यावेळी केला.
अपूर्वा किरण सामंत, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर, तालुका सचिव वसंत घडशी, महिला विधानसभा क्षेत्र प्रमुख सौ. मानसी आंबेकर आदी नेते मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.